Vinod Dengale
पावसाची पहिली सर अनेकांना आकर्षित करते. पण पावसात भिजल्याने आरोग्याला फायदा होतो की नुकसान?
पावसामुळे थेट सर्दी होत नाही. सर्दी व्हायरसमुळे होते. मात्र भिजल्यानंतर शरीर थंड झाल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो.
पहिल्या पावसात वातावरणातील धूळ, प्रदूषण आणि रासायनिक कण मिसळलेले असू शकतात. त्यामुळे पहिल्या सरीत न भिजता दुसऱ्या-तिसऱ्या सरीत भिजा.
पावसात भिजल्याने काही लोकांचा ताण कमी होतो. तसेच मातीच्या वासामुळे आणि नैसर्गिक वातावरणामुळे मन प्रसन्न होतं.
प्रदूषित पावसाच्या पाण्यामुळे काही लोकांना त्वचेची खाज, अॅलर्जी किंवा पुरळ येण्याची शक्यता असते.
पावसाचे पाणी केसांवर जास्त काळ राहिल्यास कोरडेपणा, कोंडा आणि केस गळण्याच्या समस्या वाढू शकतात.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दमा किंवा कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी पावसात जास्त वेळ भिजणं टाळावं.
ओले कपडे त्वरित बदला, स्वच्छ पाण्याने अंघोळ करा, शरीर कोरडे करा आणि, गरम पेय घ्या
विज्ञानाच्या मते थोडा वेळ पावसात भिजणं सामान्यतः धोकादायक नाही. मात्र प्रदूषित पाणी, जास्त वेळ भिजणं आणि शरीर थंड होणं टाळावं.
Monsoon Car Care Tips
eSakal