पावसाळ्यापूर्वी कारमध्ये या 7 गोष्टी नक्की करा; नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

Vinod Dengale

पावसाळा

जून महिना सुरू झाला असून आता लवकरच पाऊस सुरू होईल. त्यामुळे पावसाळ्यात वाहन सुरक्षित चालाव यासाठी या गोष्टी नक्की करा.

टायर

पावसाळ्यात गाडीच्या टायरची पकड खूप महत्त्वाची असते त्यामुळे जास्त घासलेले किंवा ग्रिप कमी झालेले टायर बदला.

बॅटरी आणि वायरिंग

पावसाळ्यात वायपर आणि लाइट्सचा वापर जास्त होतो. तसेच पाण्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका असतो त्यामुळे बॅटरी आणि वायरिंग नक्की चेक करा

ब्रेक्सची तपासणी

पावसाळ्यात ओल्या रस्त्यांवर ब्रेक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आवाज येत असेल किंवा खाली पडत असेल तर लगेच नीट करा.

वायपर ब्लेड तपास

गाडीचे वायपर डाग सोडत किंवा आवाज करत असतील तर बदला. तसेच वॉशर फ्लूइड भरून ठेवा, जेणेकरून पावसात व्हिजिबिलिटी चांगली राहील.

लाइट्स चेक

पावसाळ्यात हेडलाइट्स, टेललाइट्स, इंडिटकेटर आणि फॉग लाइट्स खुप गरजेचे असतात. यामुळे सर्व लाइट्स योग्य पद्धतीने काम करत आहेत की नाही हे चेक करा.

लिकेज

सनरूफ, दरवाजे आणि खिडक्यांच्या रबर सील्सची तपासणी करा. लिकेज असल्यास पावसाचं पाणी केबिनमध्ये जाऊन इंटिरिअर आणि इलेक्ट्रॉनिक्सचं नुकसान होऊ शकतं.

प्री-मान्सून सर्व्हिस

मान्सुन सुरू होण्यापूर्वी कारची पूर्ण सर्व्हिस करणँ गरजेचं आहे. ज्यामुळे मोठा काही प्रॉब्लम असेल तर तो लगेच लक्षात येतो.

ट्रेनचे पार्ट बाजारात का मिळत नाहीत? जाणून घ्या कारण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Parts Sold

|

ESakal

हेही वाचा