सकाळ डिजिटल टीम
थंडीच्या दिवसात लोक थंडीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी रात्री झोपताना मोजे घालतात, पण तुम्हाला माहिती आहे का? असे करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
झोपताना मोजे घालल्याने रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे पाय दुखू शकतात.
जर मोजे स्वच्छ नसतील, तर अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते आणि आपली चिडचिड देखील होऊ शकते.
रात्री झोपताना जाड मोजे घातल्याने पायांना घाम येऊ शकतो. ज्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग वाढू शकतो.
कापसाचे किंवा श्वास घेण्यायोग्य साहित्यापासून बनवलेले मोजे घालून झोपल्याने तुम्ही या समस्या टाळू शकता.
दररोज मोजे बदला आणि धुतल्यानंतरच पुन्हा घाला.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.