सूरज यादव
स्मार्टफोन हा आज जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्याचा वापर इतका वाढला आहे की बॅटरी संपल्यानंतर चार्जिंगची समस्या सामान्य बनली आहे.
प्रवासात असताना किंवा कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर अनेकदा बॅटरी संपते. तेव्हा सोयीसाठी म्हणून चार्जिंगसाठी पॉवर बँकचा वापर केला जातो.
अनेकांना वाटतं की पॉवर बँकचा वापर केल्यानं फोन खराब होऊ शकतो. पण खरंच असं होतं का? हे जाणून घेऊया.
पॉवर बँकचा वापर करणं सुरक्षित असतं. मात्र तो योग्य पद्धतीने व्हायला हवा. चुका केल्यास त्यामुळे फटकाही बसू शकतो.
चांगल्या दर्जाची पॉवर बँक वापरल्यास फोन खराब होणार नाही. चार्जिंग करताना फोन गरम तर होत नाही ना हे चेक करा.
वायरलेस चार्जिंगची सुविधाही काही फोन आणि पॉवर बँकला असते. मात्र त्या तुलनेत वायरने चार्जिंग करणं जास्त सुरक्षित असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
पॉवर बँक चार्जिंग करण्यासाठीही चांगल्या दर्जाचा आणि योग्य असा चार्जर वापरा. अनेकदा कमी दर्जाच्या चार्जरमुळे पॉवरबँक आणि त्याच्या बॅटरीची समस्या निर्माण होऊ शकते.
पॉवर बँक ओलसर जागेत किंवा उन्हात ठेवू नये. यामुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते.
पगाराच्या दिवशी करू नका 'या' पाच चुका