Anushka Tapshalkar
'प्रॉफी' (Proffee) म्हणजे कॉफीमध्ये प्रोटीन पावडर किंवा रेडी-टू-ड्रिंक प्रोटीन शेक मिसळून तयार केलेले पेय. सध्या फिटनेसप्रेमी आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांमध्ये हा ट्रेंड खूप लोकप्रिय आहे.
What Is Protein Coffee
sakal
प्रॉफी एका पेयातून कॅफिन आणि प्रोटीन दोन्ही मिळवून देते. त्यामुळे ऊर्जा, स्नायूंची रिकव्हरी आणि जास्त वेळ पोट भरल्याची भावना मिळते. व्यस्त जीवनशैली असलेल्यांसाठी हा सोयीचा पर्याय ठरतो.
Is Protein Coffee Healthy or Not
sakal
कॉफीतील कॅफिन एकाग्रता आणि सतर्कता वाढवण्यास मदत करते. तर प्रोटीन स्नायूंची दुरुस्ती, चयापचय (Metabolism) आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे असते.
Is Protein Coffee Healthy or Not
sakal
प्रोटीनमुळे भूक काही काळ कमी वाटू शकते आणि कॅफिनमुळे व्यायामाची कार्यक्षमता वाढू शकते. मात्र, केवळ प्रॉफी पिऊन वजन कमी होत नाही.
Is Protein Coffee Healthy or Not
sakal
तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणावावर नियंत्रण आणि सातत्य या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत.
Is Protein Coffee Healthy or Not
sakal
काही प्रोटीन पावडर किंवा शेकमध्ये जास्त साखर, कृत्रिम फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि अनावश्यक अॅडिटिव्ह्ज असतात. त्यामुळे लेबल वाचूनच उत्पादन निवडा.
Is Protein Coffee Healthy or Not
sakal
तज्ज्ञांच्या मते, नाही. चांगल्या नाश्त्यात फायबर, हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सही असणे गरजेचे आहे. प्रॉफी हा नाश्त्याची जागा घेऊ शकत नाही.
Is Protein Coffee Healthy or Not
sakal
चांगल्या दर्जाच्या प्रोटीनसह आणि मर्यादित प्रमाणात घेतलेली प्रॉफी आहाराचा भाग असू शकते. मात्र, चांगले आरोग्य आणि फिटनेस हे व्हायरल ट्रेंडपेक्षा रोजच्या सवयींवरच अवलंबून असतात.
Vegetarian Food for Vitamin B12 Deficiency
sakal