सकाळ डिजिटल टीम
दाक्षिणात्य सिनेमा जगतातील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाचं नाव अभिनेता विजय देवरकोंडासोबत जोडलं जातं.
रश्मिका आणि विजय यांच्या वक्तव्यांमधून वारंवार त्यांच्या नात्याविषयीचे संकेत मिळतात.
एका मुलाखतीत स्वतःला ‘पार्टनर’ संबोधलं, ज्यामुळे ती सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याचं सूचित झालं.
अलीकडेच रश्मिकाने तिच्या मते, वैयक्तिक आयुष्याचं महत्त्व खूप आहे. ती म्हणाली, ‘‘घर हे माझं हॅप्पी प्लेस आहे. यामुळे मला स्थिरता जाणवते. यश येतं-जातं, पण घर कायमच राहतं. मी एक मुलगी, एक बहीण आणि एक पार्टनर म्हणून माझ्या आयुष्याचा सन्मान करते.’’
रश्मिकाने या वेळी तिला जोडीदारामध्ये काय आवडतं हेही सांगितलं. ती म्हणाली, ‘‘डोळे आत्म्याचे खिडकीसारखे असतात, असं म्हणतात आणि मी त्यावर विश्वास ठेवते. मला स्मितहास्य असलेल्या व्यक्ती आवडतात.
तसेच ज्यांना आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आदर करायचा असतो, ते मला विशेष प्रिय वाटतात.’’
रश्मिका आणि विजयने एकत्रित ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटांतील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
मात्र अद्याप या दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिलेली नाही.