सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात शरीराच्या उबेसाठी चिकन सूप अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात.
चिकन सूपमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, फ्लू आणि इतर संसर्गांपासून बचाव होतो.
हाय बीपीच्या रुग्णांसाठी चिकन सूप फायदेशीर आहे. प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने हाय बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. मात्र, मिठाचे प्रमाण कमी असावे.
चिकन सूप हाडांसाठी फायदेशीर आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फोरस यासारखे पोषक तत्व हाडांची मजबूती वाढवतात.
चिकनमध्ये प्रोटीन आणि अमिनो अॅसिड असल्याने मांसपेशींच्या विकासासाठी मदत होते. रोज एक बाउल चिकन सूप घेतल्यास याचा फायदा होतो.
चिकन सूप प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे ताजेतवाने वाटते.
सर्दी आणि खोकल्यावर चिकन सूप हा एक अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. हे शरीराच्या प्रकृतीला उत्तम राहण्यास मदत करते.
चिकन सूप प्यायल्याने सूजन कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे शरीर हलके आणि आरामदायक वाटते.