Payal Naik
रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या नात्याचा पवित्र दिवस मानला जातो. यादिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याबदल्यात भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो.
या दिवसासाठी अनेक बहिणी त्यांच्या भावासाठी रुद्राक्षाची राखी निवडतात. मात्र रुद्राक्षाची राखी बांधणं योग्य आहे का?
रुद्राक्ष हे भगवान शंकराचे स्वरूप मानले जाते आणि रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेम आणि संरक्षणाचा आहे.
रुद्राक्ष नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करतो, असे मानले जाते. रुद्राक्ष आध्यात्मिक शक्ती आणि शांतीसाठी ओळखला जातो, त्यामुळे ही राखी बांधल्याने भावाला शांती आणि सकारात्मकता लाभते.
रुद्राक्ष आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, असे मानले जाते. त्यामुळे, ही राखी भावाच्या आरोग्यासाठी एक शुभ संकेत आहे.
रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि संरक्षणाचा आहे, आणि रुद्राक्ष हे पवित्र मानले जाते, त्यामुळे रुद्राक्षाची राखी बांधणे अधिक विशेष ठरते.
राखी बांधताना शांत चित्ताने आणि सकारात्मक विचारांनी बांधा. ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करणे देखील शुभ मानले जाते
मालिकेत लग्न पण सुबोध- तेजश्रीमध्ये किती वर्षाचं अंतर आहे? आकडा वाचून भुवया उंचावतील