Pranali Kodre
विश्वास बसणार नाही, पण साबुदाणा भारतात पोर्तुगीजांनी आणला!
साबुदाणा 'टॅपिओका' नावाच्या झाडाच्या कंदापासून बनतो. हे झाड मूळचे दक्षिण अमेरिकेचे आहे.
साबुदाण्याचा पहिला उल्लेख चीनच्या ‘झू फॅन झीही’ या ग्रंथात सापडतो. लेखक झाओ रुकोव यांनी ब्रुनेईमधील अन्नात याचा उल्लेख केला आहे.
युरोपियन देशांनी व्यापाराच्या निमित्ताने विविध अन्नपदार्थ जगभर पोहोचवले. त्यातूनच साबुदाणा भारतात आला.
भारताच्या केरळमधील मलबार भागात टॅपिओकाची लागवड सुरू झाली. इथलं उष्ण हवामान यासाठी योग्य होतं.
साबुदाणा हा कंदापासून बनवलेला पदार्थ आहे. उपवासात कंद खाण्याची परवानगी असल्याने, साबुदाणाही 'उपवासाला चालतो' असे सांगितले गेले.
काही जाणकारांच्या मते, ही एक 'मार्केटिंग स्ट्रॅटेजी' होती. चवीला उत्तम आणि नियमात बसणारा पदार्थ असल्याने लोकांनी तो सहज स्वीकारला!
आश्चर्य वाटेल, पण उपासाच्या खिचडीचे सगळे मुख्य घटक (बटाटे, शेंगदाणे, मिरच्या) आपल्याकडे पोर्तुगीजांनीच आणले आहेत!
तमिळनाडूच्या सेलम शहरात साबुदाण्याचे उत्पादन सुरू झाले. त्यानंतर तो भारतभर सहज उपलब्ध होऊ लागला.
आज उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे समीकरण बनलं आहे. याचं सगळं श्रेय खरंच पोर्तुगीजांना द्यायला हवं का?