'या' व्हिटॅमिनची कमतरता ठरते रातांधळेपणाला कारणीभूत

Pranali Kodre

रातांधळेपणा

रातांधळेपणा म्हणजे रात्री किंवा कमी प्रकाशात दिसण्यास अडचण येणे. वैद्यकीय भाषेत याला नायक्टालोपिया असंही म्हणतात.

Night Blindness | Deficiency of Vitamin A | Sakal

मुख्य कारण

रातांधळेपणाचे मुख्य कारण व्हिटॅमिन ए ची कमतरता आहे.

Night Blindness | Deficiency of Vitamin A | Sakal

व्हिटॅमिन ए ची पातळी

रक्तातील रेटिनॉलच्या प्रमाणावरून व्हिटॅमिन ए ची पातळी पाहिली जाते.

Night Blindness | Deficiency of Vitamin A | Sakal

व्हिटॅमिन ए का महत्त्वाचे?

व्हिटॅमिन ए हे डोळ्यांमधील 'रोडॉप्सिन' नावाच्या रंगद्रव्याच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे, ज्यामुळे अंधारात दिसण्यास मदत होते.

Night Blindness | Deficiency of Vitamin A | Sakal

झेरोफ्थाल्मिया

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे झेरोफ्थाल्मिया म्हणजे डोळ्याचे विविध आजार उद्भवतात, ज्यात राधांधळेपणा, बिटॉत स्पॉट्स, कॉर्निया कोरडेपणा आणि अल्सर यांचा समावेश होतो.

Night Blindness | Deficiency of Vitamin A | Sakal

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेची लक्षणे

डोळ्यांचा कोरडेपणा, अंधारात पाहण्यास अडचण, डोळे चुरचुरणे, ही व्हिटॅमिन ए च्या कमतरतेची लक्षणे आहेत.

Night Blindness | Deficiency of Vitamin A | Sakal

आहारात या गोष्टींचा असू द्या समावेश

गाजर, भोपळा, गोड बटाटे, पालक, मेथी, टोमॅटो, अंडी, मासे, डेअरी उत्पादने यांचा आहारात समावेश असू द्या, ज्यामुळे शरीराला व्हिटॅमिन ए मिळू शकते.

Night Blindness | Deficiency of Vitamin A | Sakal

हे देखील महत्त्वाचे

झिंक - व्हिटॅमिन A यकृतातून डोळ्यांपर्यंत पोहोचवते

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडस्: डोळ्यांतील पेशींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे

व्हिटॅमिन C आणि E: डोळ्यांवर होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळतात.

Night Blindness | Deficiency of Vitamin A | Sakal

ही काळजी घ्या

व्हिटॅमिन्सची कमतरता टाळण्यासाठी पोषणयुक्त आहार घ्या. नियमित डोळ्यांची तपासणी करा, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या

Night Blindness | Deficiency of Vitamin A | Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Night Blindness | Deficiency of Vitamin A | Sakal

MS Dhoni चे तणाव मुक्त रहाण्याचं सिक्रेट काय? जाणून घ्या ५ खास टीप्स

MS Dhoni | Sakal
येथे क्लिक करा