महिलांनी चेहऱ्यावर रेझर वापरणं योग्य आहे का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Anushka Tapshalkar

रेझरमुळे केस जाड होतात का?

नाही! रेझरमुळे चेहऱ्यावरील केस जाड, काळे किंवा वेगाने वाढत नाहीत. हा एक सामान्य गैरसमज आहे.

Is shaving facial hair bad for women : Myths VS Facts

|

sakal

केस पुन्हा खरखरीत का वाटतात?

रेझर केसांचे टोक त्वचेच्या पातळीवर कापतो. त्यामुळे नवीन केसांचे टोक सपाट असल्याने ते काही काळ जाड किंवा खरखरीत वाटू शकतात.

Is shaving facial hair bad for women : Myths VS Facts

|

sakal

रेझर वापरण्याचे काय फायदे आहेत?

चेहऱ्यावरील बारीक केस लगेच काढता येतात. त्वचा गुळगुळीत वाटू शकते आणि मेकअप लावणे सोपे होऊ शकते.

Is shaving facial hair bad for women : Myths VS Facts

|

sakal

रेझर वापरण्याचे तोटे

चुकीच्या पद्धतीने रेझर वापरल्यास त्वचेवर जळजळ, लालसरपणा, लहान जखमा किंवा केस त्वचेच्या आत वाढण्याची समस्या होऊ शकते.

Is shaving facial hair bad for women : Myths VS Facts

|

sakal

कोणती काळजी घ्यावी?

चेहरा स्वच्छ करून स्वच्छ आणि धारदार रेझर वापरा. त्वचेवर जास्त दाब न देता केसांच्या वाढीच्या दिशेने रेझर फिरवा.

Is shaving facial hair bad for women : Myths VS Facts

|

sakal

रेझर वापरल्यानंतर काय करावे?

चेहऱ्यावर सुगंध नसलेले मॉइश्चरायझर लावा. दिवसा बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा. मुरुम किंवा त्वचेवर पुरळ असल्यास त्या भागावर रेझर वापरणे टाळा.

Is shaving facial hair bad for women : Myths VS Facts

|

sakal

जास्त केस येत असतील तर?

अचानक जाड आणि काळ्या केसांची वाढ होत असल्यास हार्मोन्समधील बदल हे एक कारण असू शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Is shaving facial hair bad for women : Myths VS Facts

|

sakal

फक्त केस नाही, त्वचेसाठीही फायदेशीर आहे जास्वंद! कसं ते जाणून घ्या

Hibiscus Powder for Skin and Hair

|

sakal

आणखी वाचा