सकाळ डिजिटल टीम
मधुमेह रुग्णांनी आहाराची काळजी घेणं आवश्यक आहे.
एकदा मधुमेह झाल्यानंतर, त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत काळजी घेणं आवश्यक असते.
ऊस हा नैसर्गिकरित्या गोड असतो, आणि त्याच्या रसातही साखरेचे प्रमाण जास्त असते.
उसाच्या रसात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात.
ऊस आणि त्याचा रस उन्हाळ्यात पिणे आरोग्यासाठी फायद्याचे असते.
ऊसाच्या रसात असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते नुकसानकारक ठरू शकते.
मधुमेह असलेल्या रुग्णांनी उसाचा रस टाळावा, कारण त्यामुळे साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते.
मधुमेही रुग्णांनी फक्त चवीसाठी तो रस पिऊ शकतात, पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.