Aarti Badade
दही हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात प्रथिने, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, आणि व्हिटॅमिन बी६ आणि बी१२ यांसारखे पोषक घटक असतात.
गुळात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड आणि लोह यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक आहेत.
दही आणि गूळ एकत्र खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
दही आणि गूळ एकत्र खाल्ल्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होऊ शकतो.
गुळ आणि दही एकत्र सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होऊन हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.
दह्यात आणि गुळात कॅल्शियम असल्यामुळे, या दोन्ही पदार्थांचा एकत्र सेवन हाडे मजबूत करण्यास मदत करतो.
जर तुम्हाला रक्तदाबाशी संबंधित समस्या असतील, तर दही आणि गुळाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
गूळ आणि दही सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो आणि शरीरातील ऊर्जा वाढते.