सकाळ डिजिटल टीम
पावटा, भांबुर्डीचा पाला, बटाटा सालासकट कापून ,अंडी, मसाला लावलेले चिकन, ओवा,जाडे मीठ, मातीचे मडके
मातीचे मडके घ्या. त्यात तळाला भांबुर्डीच्या पाल्याचा थर लावा आणि मग त्यावर पवटा च्या शेंगांचा थर लावा.
त्यावर अंडी, बटाटे, कांदे आणि पुन्हा पावटाचा शेंगांचा थर लावा आणि मग जाडे मीठ आणि ओवा चवीनुसार पसरवा.
पुन्हा त्यावर शेंगांचा थर लावा आणि इतर साहित्यही टाका, सर्व व्यवस्थित थर लागले की मडक्यातील सर्व पदार्थ नीट बसतील असे हलवून घ्या.
त्यानंतर वरून भांबुर्डीच्या पाल्याने मडक्याचे तोंड बंद करा आणि मग जमिनीवर शेकोटी करतो तसे मडके उलटे ठेऊन वरुण झाळ लावला जातो.
चांगली धग लागण्यासाठी मडक्यावर गोणपाट टाका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मडक्याला सर्व बाजूने धग मिळण्याची गरज आहे
साधारण अर्धा ते पाऊण तास तुम्हाला हे ठेवावे लागते. पोपटी शिजली आहे की नाही हे कळण्यासाठी वरून पाण्याचे दोन – तीन थेंब टाकावे. लगेच गायब झाल्यास पोपटी शिजली असे समजण्यात येते.
यानंतर मडके उचलून गोणपाटावर उलटे करावे आणि मग सर्व साहित्य काढून पटकन दडपवून घ्यावे. आता गरमागरम पोपटी खाण्यासाठी तयार.