Aarti Badade
गुडघे, बोटं किंवा घोट्यांमध्ये वेदना आणि सूज जाणवू लागते. विशेषतः सकाळी उठल्यानंतर दुखणं अधिक जाणवतं.
लघवीचा रंग सामान्यापेक्षा गडद होतो, यामागे युरिक अॅसिडचे प्रमाण वाढलेले असते.
उजळ कारण नसताना ताप येत राहतो – हे शरीरातील दाहक प्रक्रियेचं लक्षण असू शकतं.
सतत थकल्यासारखं वाटणं, कामात लक्ष न लागणं, शरीरात ऊर्जा कमी वाटणं हे लक्षण असू शकतं.
युरिक अॅसिड वाढल्यामुळे त्वचेला खाज येणे किंवा रॅशेस होणे सुरू होते.
स्नायूंमध्ये दडपण जाणवणे किंवा पाठकणा व कंबरेत ताण येणं हे सूक्ष्म लक्षणं आहेत.
पचनशक्तीवर परिणाम होतो, भूक लागत नाही आणि अपचन, गॅस ही लक्षणं दिसून येतात.