Aarti Badade
मुलाचं वजन कमी असणं, वारंवार आजारी पडणं, थकवा, चिडचिड – ही पोषणाच्या कमतरतेची प्रमुख लक्षणं आहेत.
मुलांना सतत पोट दुखणं, अकारण घाम येणं, कृमी होणं यामुळे भूक मंदावते.
जंक फूड टाळा, घरगुती व हलका आहार द्या. जेवणाच्या वेळा नियमित ठेवा.
आयुर्वेदीय बाळगुटीने पचन सुधारतं, भूक वाढते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.
जेवल्यानंतर ताक, जिरे-हिंग युक्त मसाले, वाफवलेल्या भाज्या यांचा वापर करा.
दूध न आवडल्यास खीर, चव बदलणारे पूड, किंवा पोळीच्या कणकेत दूध वापरा. भाज्या वेगवेगळ्या प्रकारे द्या.
भूक न लागणं ही गंभीर बाब असू शकते. वैद्यांचा सल्ला घेऊन औषधी, अभ्यंग तेल यांचा उपयोग करा.