सकाळ डिजिटल टीम
कॉलेस्ट्रॉल पेशींच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असला तरी, त्याची पातळी वाढल्यास हृदय रोगांचा धोका वाढतो.
उच्च कॉलेस्ट्रॉलचे मुख्य कारणे: चरबीयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, वजन वाढणे, धूम्रपान आणि मद्यपान, तसेच अनुवांशिक कारणे.
कॉलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर पिवळे ठीपके आणि गाठी दिसू लागतात, मुख्यतः डोळ्याच्या खाली, कोपरांवर आणि गुडघ्यांवर.
जास्त कॉलेस्ट्रॉल जमा होण्यामुळे नसा आखडतात, रक्तप्रवाह कमी होतो, आणि शारीरिक कृती करताना हाता-पायात मुंग्या येतात.
उच्च कॉलेस्ट्रॉल पचनसंस्थेवरही परिणाम करतो, ज्यामुळे पित्ताशयाच्या पिशवीत दगड होऊ शकतात आणि पोटाच्या उजव्या बाजूस दुखणं सुरू होऊ शकतं.
शरीरात प्लाक जमा होण्यामुळे छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास अडचणी येऊ शकतात.
प्लाक जमा होण्यामुळे धमन्या फाटू शकतात किंवा ब्लॉक होऊ शकतात, ज्यामुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. स्ट्रोक नंतर शरीर सुन्न होऊ शकते, आणि बोलताना त्रास होऊ शकतो.