सकाळ डिजिटल टीम
सध्याच्या धुळीमुळे आणि प्रदूषणामुळे आपले केस खराब होतात. सर्वांना लांब आणि चमकदार केस हवे असतात, पण वातावरणामुळे हे साधणे कठीण होऊन जातं.
पार्लरमध्ये जाऊन महागडे स्पा आणि ट्रिटमेंट्स करूनही काही फरक पडत नाही. आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला चांगले केस मिळू शकतात.
केस धुण्याच्या वेळी शॅम्पूमध्ये साखर मिसळून वापरा. यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार होतील.
शॅम्पू एका वाटीत काढा, त्यात एक चमचा साखर मिसळा आणि हे मिश्रण केसांवर लावून मसाज करा. नंतर केस धुवा.
जर तुमचं लक्ष केसांची मजबूती वाढवण्यावर असेल, तर शॅम्पू आणि साखरेचा मिश्रण वापरा. यामुळे तुमचे केस मजबूत आणि दाट होतील.
जर तुमचं लक्ष लांब केसांवर असेल, तर हे मिश्रण आठवड्यातून एकदा वापरा. यामुळे केसांची वाढ सुधारेल आणि ते लांब होईल.
कोरड्या केसांसाठी सुद्धा हे मिश्रण फायदेशीर आहे. साखर आणि शॅम्पूचा वापर केसांना चांगले आणि सौम्य ठेवतो.
उन्हाळ्यात खाज, घामोळ्या आणि पुळ्या येण्याच्या समस्यांचा सामना होतो. शॅम्पू आणि साखर मिश्रणामुळे हे समस्याही कमी होतात.