अचानक ताप अन् 'हे' लक्षण जाणवतय? असू शकतो कॅन्सर!

Aarti Badade

सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे वेळेवर निदान झाले तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते, परंतु अनेकजण सुरुवातीची चिन्हे सामान्य समजून दुर्लक्ष करतात.

Symptoms of blood cancer

|

Sakal

विनाकारण वजन कमी होणे

कोणताही डाएट किंवा व्यायाम न करता जर तुमचे वजन झपाट्याने घटत असेल, तर हे चिंतेचे कारण असू शकते; कॅन्सरच्या पेशी शरीरातील ऊर्जा वापरून वजन कमी करतात.

Symptoms of blood cancer

|

Sakal

सतत जाणवणारा थकवा

पुरेशी झोप आणि विश्रांती घेऊनही जर शरीरातील थकवा जात नसेल, तर हा एक गंभीर संकेत असू शकतो; अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Symptoms of blood cancer

|

Sakal

विनाकारण सतत येणारा ताप

शरीरात कोणताही संसर्ग (Infection) नसतानाही जर सतत ताप येत असेल, तर ते रक्ताच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

Symptoms of blood cancer

|

Sakal

शरीरातील सततच्या वेदना

पाठदुखी, डोकेदुखी किंवा हाडांमधील वेदना दीर्घकाळ कायम राहत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका; हे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात.

Symptoms of blood cancer

|

Sakal

मेटाबॉलिझममधील बदल

जेव्हा शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या चयापचय क्रियेवर (Metabolism) होतो, ज्यामुळे शरीरात असामान्य बदल दिसू लागतात.

Symptoms of blood cancer

|

Sakal

वेळेवर तपासणी हाच बचाव

शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही असामान्य बदलांकडे दुर्लक्ष न करता, वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आवश्यक तपासण्या करणे हाच बचावाचा उत्तम मार्ग आहे.

Symptoms of blood cancer

|

Sakal

डोक्यावर टक्कल पडू लागलंय? घनदाट केसांसाठी 'हे' उपाय करा!

Hair Growth Tips

|

Sakal

येथे क्लिक करा