सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात उष्णतेमुळे केसांमध्ये घाम आणि वास येण्याची समस्या वाढते. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात.
केसांमध्ये जास्त वेळ घाम राहिल्याने ते खराब होऊ शकतात. या समस्येवर मात करण्यासाठी अनेक लोक विविध प्रोडक्टस वापरतात, पण त्याने काही वेळा समस्या वाढू शकते.
उन्हाळ्यात केसांना नियमितपणे आणि योग्य वेळी शॅम्पू करा. माइल्ड शॅम्पू वापरणे चांगले, ज्यामुळे केस स्वच्छ राहतात आणि घाम कमी होतो.
शॅम्पू केल्याने केसांमध्ये रक्ताभिसरण चांगले राहते आणि घाम येण्याची समस्या कमी होते.
ॲपल साइडर व्हिनेगर हे शरीरासाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. याचा वापर केल्याने केसांमध्ये घाम येण्याची समस्या कमी होते.
एक चमचा ॲपल साइडर व्हिनेगर घ्या आणि त्यात गरम पाणी मिसळून स्काल्पला मसाज करा. 20 मिनिटे ते तसेच ठेवा आणि नंतर केस धुवा.
लिंबू हे केसांसाठी आणि शरीरासाठी फायदेशीर आहे. त्याचा वापर करून तुम्ही केसांमधील घाम आणि दुर्गंधी दूर करू शकता.