सकाळ वृत्तसेवा
फिटनेससाठी अतिव्यायाम करताय? डॉक्टर सांगतात, हर्नियासारखा त्रास होऊ शकतो!
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय अधिक वजन उचलणे पोटाच्या स्नायूंना त्रासदायक ठरू शकते.
पोटातील अवयव स्नायूंमधून बाहेर येतात. त्यामुळे फुगवटा तयार होतो – यालाच ‘हर्निया’ म्हणतात.
अतिव्यायाम, मलावरोध, सिझेरियन टाके, उपजत कमजोरी, आणि चुकीचे व्यायाम प्रकार.
रिल्स पाहून घाईत व्यायाम सुरू करू नका! चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने हर्नियाचा धोका वाढतो.
टप्प्याटप्प्याने व्यायाम सुरू करा. तज्ज्ञ मार्गदर्शनाखालीच वजन उचला.
पोटावर किंवा जांघेवर फुगलेली गाठ, दुखणे – ही लक्षणे दुर्लक्षित करू नका!
हर्निया गंभीर होण्याआधी शस्त्रक्रियेद्वारे उपचार करून तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.