सकाळ डिजिटल टीम
स्लीप पॅरालिसिस ही एक झोपेची अवस्था आहे जिथे मन जागं असतं पण शरीर हलत नाही. ही स्थिती काही सेकंद ते काही मिनिटांपर्यंत टिकते.
या अवस्थेत व्यक्तीला हलता येत नाही, बोलता येत नाही आणि कधी कधी विचित्र भासही होतात जणू कोणी आपल्यावर हल्ला करतोय.
झोपेच्या REM (Rapid Eye Movement) अवस्थेत मेंदू अर्धवट जागा होतो, पण शरीर अजूनही "लॉक" अवस्थेत असतं – हाच स्लीप पॅरालिसिस!
उशिरा झोपणं, वारंवार झोपमोड, किंवा झोपेचं वेळापत्रक बिघडल्यामुळे स्लीप पॅरालिसिस होतो.
खूप ताणतणाव, चिंता, किंवा नैराश्य झोपेच्या गडबडीत वाढ करतात – आणि यामुळे स्लीप पॅरालिसिसचा धोका वाढतो.
शारीरिक थकवा, झोप पूर्ण न होणं हे मेंदू व शरीरामधील समन्वय बिघडवतं – आणि स्लीप पॅरालिसिसची शक्यता वाढते.
पाठीवर झोपल्यावर स्लीप पॅरालिसिसचे प्रमाण वाढते असे काही संशोधनातून समोर आलंय.
हो! झोपेची वेळ ठरवून ठेवणं, स्ट्रेस कमी करणं आणि योग्य झोप घेणं – हे उपाय स्लीप पॅरालिसिसपासून वाचवू शकतात.