Aarti Badade
हळद केवळ मसाल्याचा पदार्थ नाही, तर ती एक औषधी वनस्पती आहे. कोमट पाण्यात हळद टाकून दिवसाची सुरुवात केल्यास आरोग्याला अनेक चमत्कारिक फायदे मिळतात.
Benefits of turmeric water
Sakal
हळदीच्या पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि यकृताच्या कार्याला चालना मिळते. यातील 'कर्क्युमिन' हे नैसर्गिक संयुग शरीरातील दाह कमी करण्यास मदत करते.
Benefits of turmeric water
Sakal
नियमित हळदीचे पाणी प्यायल्याने त्वचा स्वच्छ होते, मुरूमांची सूज कमी होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही हे पाणी अत्यंत उपयुक्त मानले जाते.
Benefits of turmeric water
Sakal
हळदीमधील अँटीऑक्सिडंट्समुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयविकार, संधिवात आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
Benefits of turmeric water
Sakal
शरीर हळदीतील 'कर्क्युमिन' सहजासहजी शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे हळदीच्या पाण्यात चिमूटभर काळी मिरीची पूड टाकणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात.
Benefits of turmeric water
Sakal
जास्त हळद प्यायल्याने अॅसिडीटी, मळमळ किंवा पोटात मुरडा येऊ शकतो. तसेच लोहाचे शोषण कमी झाल्याने अॅनिमियाचा धोका वाढू शकतो.
Benefits of turmeric water
Sakal
गर्भवती महिला, पित्ताशयात खडे असणारे रुग्ण किंवा ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हळदीचे पाणी पिऊ नये. यामुळे त्रास वाढण्याची शक्यता असते.
Benefits of turmeric water
Sakal
हळद रक्तातील साखरेची पातळी कमी करते. जर तुम्ही मधुमेहाची औषधे घेत असाल, तर साखर अचानक खूप कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Benefits of turmeric water
Sakal
हळदीचे पाणी प्यायल्यानंतर सतत पोटदुखी, मळमळ किंवा जुलाब होत असल्यास ते त्वरित बंद करा. सेंद्रिय हळदीचाच वापर करणे शरीरासाठी सर्वोत्तम आहे.
Benefits of turmeric water
Sakal
after meal Causes of sweet cravings
Sakal