तुमचं यकृत धोक्यात आहे का? 'या' गंभीर कारणांकडे दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

यकृत म्हणजे काय?

आपल्या शरीरातील यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे. तो पचनक्रिया, डिटॉक्सिफिकेशन आणि पोषक तत्वांच्या साठवणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतो.

liver disease symtoms | Sakal

यकृताचे आजार: छुपे धोके!

यकृताचे आजार म्हणजे यकृताला होणारी हानी, ज्यामुळे त्याचे कार्य बिघडते. हे आजार विषाणू, जास्त मद्यपान किंवा अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतात.

liver disease symtoms | Sakal

मुख्य कारणे: हेपेटायटीस आणि फॅटी लिव्हर

हेपेटायटीस (विषाणूजन्य संसर्ग) आणि फॅटी लिव्हर (यकृतामध्ये जास्त चरबी जमा होणे) ही यकृताच्या आजारांची काही प्रमुख कारणे आहेत.

liver disease symtoms | Sakal

गंभीर आजार: सिरोसिस आणि कर्करोग

सिरोसिस (यकृताला डाग पडणे) आणि यकृताचा कर्करोग हे यकृताच्या गंभीर आजारांपैकी आहेत, जे जीवघेणे ठरू शकतात.

liver disease symtoms | Sakal

ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा!

पोटदुखी, त्वचा-डोळे पिवळे पडणे (कावीळ), सततचा थकवा, शरीरावर सूज, भूक न लागणे, मळमळ-उलट्या आणि त्वचेला खाज ही यकृताच्या आजारांची प्रमुख लक्षणे आहेत.

liver disease symtoms | Sakal

उपचारात जीवनशैली बदल महत्त्वाचे

यकृताच्या आजारांवर उपचार त्याच्या कारणावर अवलंबून असतात. पण मद्यपान टाळणे, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे उपचारात अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

liver disease symtoms | Sakal

यकृताच्या आरोग्यासाठी आजच सावध व्हा!

जर तुम्हाला यकृताच्या आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. वेळेवर उपचार घेऊन यकृताचे आरोग्य सांभाळा!

liver disease symtoms | Sakal

पावसाळ्यात येणारी 'ही' फळे खा आणि निरोगी राहा!

Best Fruits for Monsoon Wellness | Sakal
येथे क्लिक करा