Aarti Badade
होय, अनेक जणांना हे वाटते. पण योग्य पद्धतीने ध्यान केल्यास एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होतो.
ध्यानासाठी शांत आणि आरामदायी जागा निवडा. पाठ सरळ ठेवा आणि हात मांडीवर किंवा गुडघ्यांवर ठेवा.
डोळे बंद केल्याने बाह्य गोष्टींपासून मन दूर राहतं आणि तुम्ही स्वतःकडे लक्ष केंद्रित करू शकता.
फक्त श्वासावर लक्ष ठेवा. प्रत्येक श्वासाची जाणीव ठेवा – यामुळे मन स्थिर राहतं.
"ओम" सारखा लहान मंत्र म्हणा किंवा शांत समुद्र, हिरवळ, प्रकाश यांची कल्पना करा – नकारात्मक विचार दूर होतात.
सकाळी किंवा झोपण्यापूर्वी ध्यान करा. सकाळी सकारात्मकता मिळते, रात्री चांगली झोप येते.
मन भटकलं तरी परत श्वासाकडे किंवा मंत्राकडे लक्ष द्या. सराव केल्याने मनही प्रशिक्षण घेतं.
दररोज फक्त ५–१० मिनिटे नियमित ध्यान केल्याने मानसिक शांतता आणि एकाग्रता दोन्ही वाढते.