Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात ६१ धावांनी पराभूत केले.
Ishan Kishan
Sakal
भारताच्या विजयात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने स्फोटक खेळी करत मोलाचा वाटा उचलला.
Ishan Kishan
Sakal
इशानने ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.
Ishan Kishan
Sakal
इशान किशन टी२० वर्ल्ड कपमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा भारताचा पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.
Ishan Kishan
Sakal
यापूर्वी टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी एमएस धोनी (३३ सामने), रिषभ पंत (१५ सामने) आणि दिनेश कार्तिक (४ सामने) यांनी यष्टीरक्षण केले आहे. मात्र या तिघांपैकी कोणीही सामनावीर पुरस्कार जिंकलेला नाही.
MS Dhoni
Sakal
तसेच इशान किशन टी२० वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक करणाराही भारताचा पहिलाच यष्टीरक्षक आहे. त्याने २०२६ च्या टी२० वर्ल्ड कपमध्ये दोन अर्धशतके केली आहे.
Ishan Kishan
Sakal
टी२० वर्ल्ड कपमध्ये धोनीची सर्वोच्च खेळी ४५ धावा आहे, तर रिषभची ४२ धावा आहे. दिनेश कार्तिकची सर्वोच्च खेळी ७ धावा आहे.
Rishabh Pant
Sakal
Jos Buttler
Sakal