Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत १४ फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड संघात सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने ५ विकेट्सने विजय मिळवला.
Jos Buttler
Sakal
या सामन्यात इंग्लंडसाठी इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरने केवळ ३ धावा केल्या, पण त्याने यादरम्यान मोठा विक्रम रचला.
Jos Buttler
Sakal
बटलरने तीन धावा करताच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या.
Jos Buttler
Sakal
बटलर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा पार करणारा जगातील चौथा, तर इंग्लंडचा पहिलाच खेळाडू आहे.
Jos Buttler
Sakal
बटलरपूर्वी केवळ विराट कोहली, रोहित शर्मा आणि बाबर आझम यांनीच असा पराक्रम केला आहे. यातील विराट आणि रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने १२५ सामन्यांत ४१८८धावा केल्या आहेत.
Virat Kohli
Sakal
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसर्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने १५९ सामन्यांत ४२३१ धावा केल्या आहेत.
Rohit Sharma
Sakal
बाबर आझम आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने १४१ सामन्यांत ४५६६ धावा केल्या आहेत.
(आकडेवारी - १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत)
Babar Azam
Sakal
Virat Kohli
Sakal