Apurva Kulkarni
'पाताल लोक सीजन 2' रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. सिरीजला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
सिरीजमध्ये जयदीप अहलावत मुख्य भुमिकेत दाखवण्यात आला आहे. परंतु अभिनयात इश्वाक सिंह यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
अभिनेता इश्वाक सिंह हा दिल्लीत राहणारा अभिनेता आहे. त्याने आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेतलेलं आहे.
रांझणा चित्रपटातून इश्वाकने करियला सुरुवात केली आहे. 2013 मध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला.
तमाशा, तुम बिन 2, वीरे दी वेडिंग, मलाल यासारख्या सुपरहिट चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप टाकली.
2020 मध्ये इश्वाक याने ओटीटीवर काम करायला सुरुवात केली. 'पाताल लोक' ही त्याची पहिली वेब सिरीज होती.
यानंतर इश्वाकने रॉकेट बॉईज, अधूरा, मेड इन हेवन सारख्या सिरीजमध्ये काम केलं.