बाळकृष्ण मधाळे
झारखंडमधील हजारीबाग जिल्हा केवळ निसर्गसौंदर्य, घनदाट जंगलं आणि डोंगराळ प्रदेशासाठीच नव्हे, तर त्याच्या हजारो वर्षांच्या रहस्यमय इतिहासासाठीही ओळखला जातो. या जिल्ह्यातील इस्को गुहा (Isko Cave) आज देश-विदेशातील इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
Isko Cave Rock Art and Its Historical Significance
esakal
जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर आणि बरकागाव ब्लॉकपासून सुमारे २५ किलोमीटरवर असलेली इस्को गुहा प्राचीन खडककलेचे एक महत्त्वाचे केंद्र मानली जाते. या गुहेच्या भिंतींवर कोरलेली आणि रंगवलेली चित्रे आजही तितकीच स्पष्ट आणि जिवंत दिसतात, जणू काही ती आजच काढलेली आहेत.
Isko Cave Rock Art and Its Historical Significance
esakal
या चित्रांमध्ये मानवाच्या जीवनातील विविध पैलू साकारलेले आहेत. काही चित्रांमध्ये आदिमानव शिकार करताना दिसतात, तर काही ठिकाणी समूहाने नृत्य करताना किंवा दैनंदिन कामांमध्ये गुंतलेली माणसं दिसतात. प्राणी, पक्षी, मानवी आकृत्या आणि सामूहिक क्रियाकलापांचे हे चित्रण त्या काळातील सामाजिक रचना, जीवनशैली आणि सांस्कृतिक जडणघडण समजून घेण्यास मदत करते.
Isko Cave Rock Art and Its Historical Significance
esakal
इस्को गुहेबाबत स्थानिक लोकांमध्ये अनेक रंजक दंतकथा प्रचलित आहेत. गावकऱ्यांच्या मते, ही चित्रे ‘बादाम राजा’ नावाच्या राजाने काढली होती. अशी श्रद्धा आहे की या राजाने आपल्या विवाहप्रसंगी ही गुहा विशेष सजवली होती आणि लग्नाच्या मधुचंद्राच्या रात्रीसाठी ती वापरली होती. त्यामुळेच या गुहेला ‘विवाहाची गुहा’ असेही संबोधले जाते.
Isko Cave Rock Art and Its Historical Significance
esakal
विशेष म्हणजे, गुहेच्या भिंतींवर कोहबार कलेची झलक आढळते. कोहबार कला आजही झारखंड आणि बिहारच्या ग्रामीण भागात विवाहसोहळ्यांमध्ये वापरली जाते. यावरून ही कला परंपरा हजारो वर्षांपासून अखंड सुरू असल्याचे स्पष्ट होते.
Isko Cave Rock Art and Its Historical Significance
esakal
इस्को रॉक आर्ट पेंटिंग्जचा शोध लावणाऱ्या पद्मश्री पुरस्कार विजेते बुलू इमाम यांच्या सून अलका इमाम यांच्या मते, ही खडककला सुमारे ५,००० ते १०,००० वर्षे जुनी आहे.
Isko Cave Rock Art and Its Historical Significance
esakal
इमाम यांच्या म्हणण्यानुसार, ही चित्रे केवळ सजावटीसाठी नसून त्या काळातील माणसांच्या भावना, विचारसरणी आणि अनुभवांचे प्रभावी प्रतिबिंब आहेत. आजही ग्रामीण जीवनात दिसणाऱ्या अनेक परंपरांची मुळे या प्राचीन कलेत आढळतात.
Isko Cave Rock Art and Its Historical Significance
esakal
Chhatrapati Sambhajinagar Tourism
esakal