सकाळ वृत्तसेवा
अनेक धर्मांमध्ये अनिष्ट चालीरीती असतात. मात्र चुकीच्या प्रथा चालवण्याचा ठेका महिलांच्याच खांद्यावर असतो.
इस्लाममध्ये तीन प्रकारचे घटस्फोट असतात. एक तलाक (यामध्ये पती एकतर्फी निर्णय घेतो), दुसरं आहे फस्क (यामध्ये पत्नी एकतर्फी निर्णय घेते) आणि तिसरं आहे खुलअ (यात दोघांचं संगनमत असतं).
तलाक या घटस्फोटाच्या प्रकारामध्ये अनिष्ट परंपरा जोपासली जाते. ती म्हणजे हलाला. तलाक झाल्यानंतर पुन्हा दोघांना एकत्र यायचं असेल तर हालाला करावा लागतो.
तलाक दिलेल्या पत्नीला पुन्हा एखाद्या परपुरुषाशी लग्न करावं लागतं. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतात. त्यानंतर त्या पुरुषाला तलाक देऊन पहिल्या पतीशी लग्न करण्याची परवानगी मिळते.
या प्रकाराला निकाह हलाला असं म्हणतात. सातत्याने तलाक घेण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी ही प्रथा प्रचलित आहे. परंतु यात निष्कारण महिलेचा बळी जातो.
हलाला निकाह म्हणजे वैध विवाह मानला जातो. परंतु कुराणमध्ये याबाबतचे नियम सांगितलेले आहेत.
तलाक झाल्यानंतर दुसरा पती मरण पावला किंवा त्यानेही तलाक दिला तर अशावेळी पहिल्या पतीची इच्छा असेल तर हालाला निकाह होऊ शकतो. अर्थात पत्नीचीही इच्छा असावी लागते.
दुसऱ्या विवाहानंतर महिलेचा घटस्फोट झाला असेल किंवा विधवा झाली असेल तर पहिल्या पतीशी तिला पुन्हा लग्न करता यावं, यासाठी हालाला विवाह प्रकार आहे.
या विवाहाची दुसरी बाजू अशी की, यामुळे घटस्फोटीत किंवा विधवा स्त्रीला पुन्हा पहिल्या पतीसोबत लग्न करण्याची संधी मिळते. अशा महिलांच्या पुनर्विवाहाला एकप्रकारे मान्यता देण्याचा हा प्रकार आहे.
हालालाचा वाईट उपयोग करुन मुस्लिम धर्मगुरु आणि पुरुषांनी मुस्लिम स्त्रीयांचं लैंगिक शोषण केल्याच्या अनेक घटना आहेत.
पहिल्या पतीशी पुन्हा लग्न करण्यासाठी दुसरा विवाह करुन घटस्फोट घ्यायला हवा, ही विकृती नंतरच्या काळात आली. त्या महिलेला दुसरा विवाह करायचाच नसेल तर काय? हा प्रश्न अनुत्तरित राहातो.