इस्रायलच्या मोसादचे 5 धाडसी, जगप्रसिद्ध ऑपरेशन्स कोणते?

संतोष कानडे

ऑपरेशन एनटेबे

इस्रायली कमांडोच्या इतिहासातलं हे सर्वात धाडसी ऑपरेशन होतं. पॅलेस्टिनी आणि जर्मन दहशतवाद्यांनी फ्रान्सचं विमान हायजॅक केलं होतं.

युगांडा

मोसादने हजारो मैल लांब असलेल्या युगांडात जाऊन १०० हून अधिक प्रवाशांची सुटका केली. गुप्त माहितीच्या आधारावर हे ऑपरेशन सक्सेस केलं.

एडॉल्फ आइकमन

दुसऱ्या महायुद्धात लाखो ज्यूंच्या हत्येला जबाबदार असलेला नाझी अधिकारी एडॉल्फ आइकमनला मोसादने शोधून त्याचं अपहरण केलं.

अर्जेंटिना

आइकमन अर्जेंटिनामध्ये नाव बदलून रहात होता. मोसादच्या एजंट्सनी तिथे जाऊन त्याचा गुपचूप विमानातून इस्रायलला आणले. नंतर त्याचा फाशी ठोठावण्यात आली.

ऑपरेशन डायमंड

एका इराकी वैमानानिकाला भरीस घालून त्याला विमानासह इस्रायलमध्ये लँडिंग करायला लावलं. हे MiG-21 लढाऊ विमान होतं.

रशियन विमान

या रशियन विमानाची तांत्रिक माहिती इस्रायलने जाणून घेतली आणि त्याचा फायदा १९६७च्या युद्धामध्ये झाला.

ऑपरेशन व्रॅथ ऑफ गॉड

ब्लॅक सप्टेंबरच्या दहशतवाद्यांनी १९७२ मध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये ११ इस्रायली खेळाडूंची हत्या केली होती.

ऑपरेशन

या हत्येचा बदला घेण्यासाठी मोसादने जगभरात पसरलेल्या त्या दहशवाद्यांना गाठून-गाठून ठार केलं. हे ऑपरेशन २० वर्षांपेक्षा जास्त काळ सुरु होतं.

अणू संग्रहालयावर छापा

इराणची राजधानी तेहरानमधील एका गुप्त गोदामामध्ये मोसादचे एजंट्स घुसले आणि इराणच्या अणू कार्यक्रमाची हजारो मूळ कागदपक्षे आणि सीडी पळवल्या.

इराण

एका रात्रीत इराणचा सर्व डेटा इस्रायलने गायब केला. या ऑपरेशनमुळेच इराण अण्वस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं जगासमोर आलं.

इराणमध्ये हिंदू किती आहेत, त्यांची अवस्था कशीय?

<strong>येथे क्लिक करा</strong>