Israel vs Iran : एकेकाळचे मित्र एका रात्रीत बनले शत्रू , ४६ वर्षांपूर्वी काय घडलं?

सकाळ डिजिटल टीम

इस्रायलचा हल्ला

इस्रायल आणि इराण यांच्यात पुन्हा युद्धाची ठिणगी पडल्यानं जगाचं लक्ष मध्य पूर्वेकडे वळलं आहे. इस्रायलने इराणच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट करत हल्ले केले आहेत.

Israel Vs Iran

|

Esakal

दबाव

इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ न देण्यासाठी इस्रायल आणि अमेरिकेकडून दबाव टाकला जातोय. त्यातूनच दोन्ही देशांमध्ये संघर्षाची ठिणगी पडलीय.

Israel Vs Iran

|

Esakal

संघर्ष

इस्रायल आणि इराण यांच्यात आज युद्ध होण्यापर्यंत संघर्ष सुरू असला तरी एकेकाळी दोन्ही देश एकमेकांचे खास मित्र होते. पण एका रात्रीत शत्रुत्व निर्माण झालं.

Israel Vs Iran

|

Esakal

मैत्री

१९७९ च्या आधी इराणमध्ये शाह मोहम्मद रजा पहलवी यांची सत्ता होती. १९५० नंतर इराण दुसरं मुस्लिम बहुल राज्य बनलं होतं. याला इस्रायलनेसुद्धा मान्यता दिली होती.

Israel Vs Iran

|

Esakal

इस्लामी क्रांती

१९७९ मध्ये इस्लामी क्रांती झाली आणि आयातुल्ला खामेनेई यांच्या हाती इराणची सत्ता आली. त्यांनी इस्रायल पाश्चिमात्य साम्राज्यवादाचं प्रतिक असल्याचं म्हणत संबंध तोडले.

Israel Vs Iran

|

Esakal

शीतयुद्ध

१९८० पासून दोन्ही देशांमध्ये शीतयुद्ध सुरू होतं. इराणने लेबनानमध्ये हिजबुल्लाला तर पॅलेस्टाइमध्ये हमासला पाठिंबा देत इस्रायलला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

Israel Vs Iran

|

Esakal

इराणचा धोका

अण्वस्त्र सज्ज देश बनण्यासाठी इराणची धडपड सुरू असल्याचं समोर येताच इस्रायलने आपल्यासाठी हा मोठा धोका असल्याचं म्हटलं. त्यानंतर इस्रायलने अनेकदा इराणच्या न्यूक्लिअर प्लांटवर हल्ले केले.

Israel Vs Iran

|

Esakal

हल्ले

इराण आणि इस्रायल यांच्यात थेट संघर्ष २०२४-२०२५ मध्ये सुरू झाला. दोन्ही देशांकडून मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले गेले.

Israel Vs Iran

|

Esakal

Chorotsav : केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून गावकरी स्वत:ला घेतात गाडून

Shimgotsav In Goa

|

Esakal

इथं क्लिक करा