संतोष कानडे
पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील इटाचुना राजबारी (राजवाडा) ही १७व्या शतकातील भव्य आणि प्राचीन हवेली असून आजही तिचा इतिहास जिवंत आहे.
ही हवेली कुण-चौधुरी कुटुंबाने बांधली. ते मूळचे दख्खनेतील मराठा कुटुंब होतं.
इटाचुना हे नाव दोन शब्दांपासून तयार झाले. इटा (इंटा/विटा)+चुना (लाईम) म्हणजे विटा–चुन्याची हवेली.
या घराण्याचे पूर्वज मराठा करसंकलनदार होते. बंगालमध्ये ते "बर्गी" म्हणून ओळखले जात.
ही हवेली राजस्थानी–मराठी–बंगाली शैलींचा अप्रतिम नमुना आहे. मोठे अंगण, लांब प्रांगणे, लाकडी झरोके आणि उत्तम शिल्पकाम केलेले आहे.
या राजवाड्यात आजही जुने शिवमंदिर, राधा–कृष्ण मंदिर आणि पूजास्थाने टिकवून ठेवली आहेत.
इथे दरवर्षी पूजा, सांस्कृतिक सोहळे आणि पारंपरिक बंगाली उत्सव साजरे होतात. हे कुटुंब आजही या परंपरा जपत आहे.
काही वर्षांपूर्वी राजवाड्याचे नूतनीकरण करून तिला हेरिटेज होमस्टेमध्ये रूपांतरित केले. पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा आणि इतिहास अबाधित ठेवला आहे.
इटाचुना हा राजवाडा अनेक चित्रपट, मालिका आणि OTT शोजच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे.
आजही हे बंगालमधील सर्वात लोकप्रिय हेरिटेज स्पॉट आहे. राजबारीचे वातावरण, जुन्या काळाची वास्तु आणि शांत परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.