Monika Shinde
जर तुम्ही नियमितपणे इनकम टॅक्स भरत असाल, तर इनकम टॅक्स विभागाच्या ई-फायलींग या पोर्टलवरपोर्टलवर थेट ऑनलाईन फॉर्म भरणे शक्य असते.
या पोर्टलवर तुमची काही माहिती आधीच रेकॉर्ड मध्ये असल्यामुळे, ती फॉर्ममध्ये आधीच भरलेली दिसते आणि त्यामुळे फॉर्म भरण्याचा वेळ आणि मेहनत दोन्ही कमी होते.
ऑफलाइन Excel युटिलिटीच्या तुलनेत ऑनलाईन पद्धत जलद, सोपी आणि त्रुटी कमी होते. काही माहिती आपोआप भरली जाते, ज्यामुळे मॅन्युअल भरताना होणाऱ्या चुका टळतात.
ज्यांना ऑनलाईन फाइलिंग करायला त्रास होतो, ते Excel मध्ये फॉर्म भरून नंतर पोर्टलवर अपलोड करू शकतात. त्यामुळे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंब (HUF) जे पगार, पेन्शन, भांडवल नफा, एकाहून अधिक घरमालकीतून उत्पन्न किंवा इतर स्त्रोतांकडून उत्पन्न मिळवतात, पण व्यवसाय/व्यावसायिक उत्पन्न नसते, त्यांनी ITR-2 वापरायचा आहे.
23 जुलै 2024 नंतर आणि त्यापूर्वीच्या काळातील दीर्घकालीन भांडवल नफ्यावर वेगळा करदर आणि निर्देशांक लागू झाला आहे. त्यामुळे करपणे वेगळ्या प्रकारे करणे आवश्यक आहे.
आतापर्यंत ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त होते त्यांना मालमत्ता जाहीर करायची होती. आता ही मर्यादा 1 कोटी रुपये केली गेली आहे.