Ivory Shade किंवा Milk White? दातांचे आरोग्य जाणून घ्या

Monika Shinde

दातांचा रंग आणि आरोग्य

सर्वांना पांढरे शुभ्र दात हवे असतात, पण आरोग्यदृष्ट्या हे खरे नाही. नैसर्गिक पिवळसर (Ivory Shade) दात हे जास्त निरोगी मानले जातात.

दातांची रचना

दात तीन थरांनी बनलेले असतात. Enamel (बाहेरील पांढरे थर), Dentin (किंचित पिवळसर), आणि Pulp (मज्जा व रक्तपुरवठा).

पिवळसर रंगाचे फायदे

नैसर्गिक हलके पिवळसर दात मजबूत Enamel आणि निरोगी Dentin दर्शवतात. संवेदनशीलता कमी असते आणि दीर्घकाळ टिकतात.

अतिशय पांढरे दाताचे धोके

जास्त Bleaching केल्यास Enamel पातळ होतो. दात संवेदनशील होतात आणि नेहमीच पांढरे असणे निरोगी असण्याची हमी देत नाही.

दातांचे आरोग्य मुख्य म्हणजे

संपूर्ण पांढरे नसून दात मजबूत, किडमुक्त आणि हिरड्या निरोगी असणे महत्त्वाचे आहे. रंग फक्त सौंदर्याचा घटक आहे.

दातांचे रंग बदलण्याची कारणे

चहा, कॉफी, तंबाखू, काही औषधे, आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे दात पिवळसर किंवा तपकिरी दिसू लागतात.

उपाय

दात नियमित साफ करणे.

Whitening खूप जास्त करणे टाळणे

धुम्रपान व कॉफी कमी करणे

नियमित डेंटिस्टेकडे तपासणी

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यासाठी वरदान की विष?

येथे क्लिक करा