Anushka Tapshalkar
उन्हाळ्यात आंब्यासोबतच फणसही पिकू लागतात. सोनेरी गऱ्यांच्या घमघमाटाने आसमंत भरून जातो.
महाराष्ट्रात कोकणात व दक्षिण भारतात केरळमध्ये फणसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. जगातील कोणत्याही फळात सर्वांत मोठे फणस कोकणाचे असतात.
आर्टोकार्पस हीटरफेलिस लॅम हे शास्त्रीय नाव असलेला फणसाचा वृक्ष ९ ते २१ मीटरपर्यंत उंच वाढू शकतो. साधारणत: कापा व बरका अशा दोन प्रमुख जाती आहेत.
फणसाच्या १०० ग्रॅम गऱ्यांमध्ये ९८ उष्मांक असतात. त्यात नगण्य प्रथिने व स्निग्ध पदार्थ असतात. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप असते.
फणसात भरपूर पोटॅशियम, अ जीवनसत्त्व, बी-१ आणि बी-२ जीवनसत्त्व असते. आठिळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्चही असते.
पिकलेल्या फणसातील गरे अत्यंत गोड असतात. काप्या फणसाचे गरे चावून खाता येतात, तर बरक्या फणसाचे गरे कुस्करून रस काढता येतो.
पिकलेल्या काप्या फणसाचे गरे नुसते वाळवून ठेवले तरीही छान लागतात. काप्या गऱ्याचा मुरांबा अत्यंत चविष्ट होतो.
हिवाळ्यात पानगळ होते तेव्हा ही पानं गोळा करून बांबूच्या पातळ चोयट्यांनी या पानाच्या पत्रावळ्या व द्रोण कोकणात तयार करतात.