बाहेरून काटेरी अन् आतून रसाळ असणाऱ्या फळाचे आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

फणस

मे आणि जून महिन्यात बाजारात फणसाची आवक मोठ्या प्रमाणात होते.

फणस हे फळ या दिवसांमध्ये आवर्जून खाल्ले जाते.

बाहेरून काटेरी आणि आतून रसाळ असणारे हे फळ सगळ्यांनाच खायला आवडते.

फणसाचे फळ आरोग्यासाठी लाभदायी मानले जाते. फणसाचे आरोग्याला होणारे फायदे कोणते? जाणून घेऊयात.

पचनक्षमता सुधारते

फणसामध्ये फायबर्सचे विपुल प्रमाण आढळते. त्यामुळे, पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.

मधुमेह

फणसामध्ये फायबर विपुल प्रमाणात असते, जे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखते.

त्वचा राहते हेल्दी

फणसामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स तसेच व्हिटॅमिन सी असते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हे दोन्ही पोषकतत्वे फायदेशीर आहेत.

ग्रीन टी प्या अन् निरोगी राहा..! जाणून घ्या फायदे