सकाळ डिजिटल टीम
तुम्ही आत्तापर्यंत फणसाचे फायदे एकले असलीत पण फणसाच्या आठळीचे फायदे एकलेत का तुम्ही?
फणसाच्या आठळीणे आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.
फणसाच्या आठळ्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामध्ये प्रथिने, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्वे आणि खनिजे या सारखे पोषक घटक देखील भरपुर प्रमाणात अढळतात.
फणसाच्या आठळ्यांमध्ये फायबर (आहार्य तंतू) जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते.
आठळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि हानिकारक घटकांविरुद्ध लढायला मदत करतात.
आठळ्यांमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात, जी हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत.
आठळ्याचा उपयोग त्वचेसाठी देखील फायदेशीर असतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आठळ्याचे पेस्ट लावल्यास फायदा होतो.
फणसाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने, ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
आठळ्यांमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शिअम असते, जे लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी आवश्यक आहेत.