सकाळ डिजिटल टीम
२००९ मध्ये 'अलादीन' चित्रपटातून जॅकलीन फर्नांडिसने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
'हाउसफुल २', 'मर्डर २', 'किक', 'ब्रदर्स', 'डिशूम', 'जुडवा २', 'मिसेस सीरियल किलर' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करून जॅकलीनने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
अभिनयासोबतच जॅकलीनचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेचा विषय असतो.
जॅकलीनने नुकतीच एका प्रतिष्ठित फॅशन शोमध्ये शोस्टॉपर म्हणून हजेरी लावली.
फॅशन टूरमध्ये डिझायनर कनिका गोयलसाठी रॅम्प वॉक करताना जॅकलीनने खास लुकमध्ये उपस्थिती दर्शवली.
जॅकलीनने सांगितलं की, “रॅम्पवर परत येणं मला घरासारखं वाटतं.
पूर्वी फॅशनमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारी जॅकलीन आता अधिक नैसर्गिक आणि आरामदायक स्टाईलला प्राधान्य देत आहे.
जॅकलीनला फॅशन केवळ स्टाईल दाखवण्याचं नव्हे, तर आत्मविश्वास आणि सकारात्मक शरीरप्रतिमेसाठी महत्त्वाचं माध्यम वाटतं.
सध्या जॅकलीन दोन कॉमेडी चित्रपट आणि एक वेब शो प्रदर्शनाच्या तयारीत आहे.
जॅकलीन फॅशन आणि अभिनय दोन्ही क्षेत्रांमध्ये आपली ओळख अधोरेखित करत आहे.