Monika Shinde
तुमचं आरोग्य हीच खरी पूंजी आहे. वारीपूर्वी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्या.
बीपी, डायबेटीस, दमा यांसारख्या आजारांवर चालू असलेली औषधे नियमितपणे घ्या. औषधांची पिशवी वेगळी करून ठेवा.
प्रवासात इंजेक्शन, गोळ्या घेतल्या असतील, तर ती नोंद वहीत करा. पुढे गरज भासल्यास डॉक्टरांना हे कळवणं सोपं जाईल.
कुठल्याही औषधाची ऍलर्जी असल्यास, त्याची स्पष्ट माहिती कागदावर लिहून सोबत ठेवा. आपत्कालीन काळात हे खूप उपयोगी ठरेल.
वारीत शरीरावर ताण येतो. म्हणून पचायला सोपा, घरचा व पौष्टिक आहार घ्या. थोडं-थोडं पण वेळच्या वेळी खा. जड व तळलेले पदार्थ टाळा.
दररोज पुरेशी झोप, थोडं चालणं, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि प्रसन्न मन या सवयी वारीत स्फूर्ती देतात.
स्वतःची काळजी घेतल्यास आजारी पडण्याची शक्यता कमी होते आणि इतर वारकऱ्यांचं आरोग्यही सुरक्षित राहतं.
जेव्हा शरीर निरोगी असतं, तेव्हाच मन भक्तीमय राहतं. आरोग्यपूर्ण वारी म्हणजेच आत्मारामाला विठोबा भेटण्याचा आनंददायक मार्ग!
वारी म्हणजे फक्त चालणं नाही, ती एक शिस्तबद्ध साधना आहे. चला, विठ्ठलनामाच्या वारीत आरोग्याची साथ घेऊन पुढे जाऊया!