जगन्नाथ पुरी! धडधडणारं हृदय दुसऱ्या मूर्तीत ठेवण्याची परंपरा काय आहे?

संतोष कानडे

जगन्नाथ मंदिर

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात दर ८ ते १९ वर्षांनी एक विधी पार पडतो, त्याला 'नवकलेवर उत्सव' असं म्हणतात.

मूर्ती

ही मूर्ती बदलण्याची एक परंपरा आहे. परंतु यावेळी एक अशी गोष्ट होते, ज्यामुळे सगळेच थक्क होतात.

स्थापना

या मूर्ती दगड किंवा धातूच्या नसून लाकडाच्या आहेत. दर काही वर्षांनी या जुन्या मूर्ती बदलून नवीन मूर्ती स्थापन केल्या जातात.

रहस्यमय वस्तू

थक्क करणारी बाब म्हणजे, जुन्या मूर्तीमधून एक रहस्यमय वस्तू काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवली जाते. यालाच 'ब्रह्म पदार्थ' किंवा 'भगवान श्रीकृष्णाचे हृदय' मानले जाते.

लष्करी बंदोबस्त

हा विधी करताना संपूर्ण शहरात अंधार केला जातो.. मंदिराबाहेर कडेकोट लष्करी बंदोबस्त तैनात असतो.

डोळ्यांवर पट्टी

विशेष म्हणजे पुजाऱ्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि हातांत हातमोजे घालतात. कोणालाही हा ब्रह्म पदार्थ पाहण्याची परवानगी नाही.

ब्रह्म पदार्थ

पुजाऱ्यांच्या अनुभवानुसार, हा ब्रह्म पदार्थ हाताला एखाद्या जिवंत सशासारखा मऊ जाणवतो आणि तो सातत्याने धडधडत असतो.

श्रीकृष्ण

या हृदयाची कथा भगवान श्रीकृष्णाशी जोडलेली आहे. श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यांचं हृदय तसंच धडधडत राहिलं.

श्रद्धा

श्रद्धा अशी आहे की हा विधी म्हणजे 'जुना देह त्यागून नवा देह धारण करणे' या निसर्गनियमाचे हे एक प्रतीक आहे.

पर्यटनासाठी भारतातलं सर्वात सुंदर शहर

<strong>येथे क्लिक करा</strong>