संतोष कानडे
भगवान जगन्नाथाच्या मंदिराशी संबंधित अनेक चमत्कार आपण ऐकत असतो, ज्याची उत्तरं कधी कधी विज्ञानाकडेही नसतात.
जगन्नाथ मंदिरावरील ध्वज रोज बदलला जातो. एकही दिवस ध्वज बदलला नाही तर १८ वर्षे मंदिर बंद राहील, अशी श्रद्धा आहे.
मंदिराच्या शिखरावरील ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेला फडकण्याचं कारण हनुमानरायांशी जोडलं जातं.
पुरानातील कथेनुसार समुद्राच्या आवाजामुळे भगवान विष्णू यांना विश्राम करता येत नव्हता.
जेव्हा हनुमानजींनी समुद्राला आवाहन करत समुद्राकडे आवाज थांबवण्याची मागणी केली.
तेव्हा समुद्राने हे आपल्या आवाक्यात नसल्याचं म्हटलं. जिथपर्यंत वाऱ्याचा वेग जाईल तिथपर्यंत आवाज जाणार.. हे थांबवायचं असेल तर तुम्ही तुमचे पिताश्री पवनदेव यांना आवाहन करावं.
पवनदेवांनीही हनुमानजींना हे शक्य नसल्याचं सांगितलं. परंतु त्यांनी पुत्र हनुमानाला यावरचा एक उपाय सांगितला.
त्यावरुन हनुमानरायांनी स्वतःच्या शक्तीला दोन भागांमध्ये विभाजीत केलं आणि वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त गतीने मंदिराला फेऱ्या मारु लागले.
यामुळे वायूचं एक असं चक्र तयार झालं की समुद्राचा आवाज मंदिरामध्ये न जाता मंदिराच्या आसपात घुमत राहिला. त्यामळे श्री जगन्नाथजी यांच्या विश्रांतीमध्ये कोणतीही बाधा आली नाही.
त्यामुळेच मंदिराचा ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो, अशी श्रद्धा आहे.
ही माहिती विविध माध्यमांद्वारे प्रसारित झालेली आहे. याबाबची पुष्टी अधिकृतरित्या झालेली नाही.