'या' मराठा सरदारामुळे वाचले होते जगन्नाथ मंदिर

सकाळ वृत्तसेवा

मराठ्यांमुळे वाचले जगन्नाथ मंदिर!

औरंगजेबाच्या काळात मंदिरे तोडण्याचा आदेश निघाला. तेव्हा मराठ्यांमुळेच जगन्नाथ मंदिराचा इतिहास टिकून राहिला.

jagannath temple | esakal

जगन्नाथ मंदिर

येथे कृष्ण, बलराम आणि सुभद्राच्या लाकडी मूर्ती आहेत. दर १२ वर्षांनी नवीन मूर्ती बनवल्या जातात.

jagannath puri | sakal

औरंगजेबाचं फर्मान

मंदिर तोडण्याचा आदेश होता. तरीही पुजाऱ्यांनी लाच देऊन मंदिर वाचवले. औरंगजेब मराठ्यांशी युद्धात गुंतल्याने मंदिरावर तात्पुरते टाळे लागले.

Jagannath Puri | sakal

रघुजी भोसले यांचे साम्राज्य

मराठ्यांनी स्थिरता मिळवली आणि देशभर आपले वर्चस्व निर्माण केले. रघुजी भोसले यांचे साम्राज्य बंगाल ते ओरिसापर्यंत विस्तारले.

Lord Jagannath | esakal

मराठ्यांचे धाडसी अभियान

दहा वर्षे मराठ्यांनी बंगाल व ओरिसावर हल्ले केले. शेवटी, नवाबाने ओरिसा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात दिला.

Lord Jagannath | esakal

रघुजी भोसले आणि मंदिराचा जीर्णोद्धार

रघुजी भोसले आणि त्यांच्या आई चिमाबाई यांनी जगन्नाथ मंदिराला खूप दान दिले. त्यांनी पूजेसाठी जमीन दिली आणि 'मोहनभोग' ही परंपरा सुरू केली.

Lord Jagannath | esakal

रथयात्रा – मराठ्यांचे भव्य योगदान

रघुजी भोसले यांनी रथयात्रा आणखी भव्य केली. त्यांनी त्यासाठी मोठा निधी दिला. यात्रेतील ‘झुलना यात्रा’ मराठ्यांनीच सुरू केल्याचे मानले जाते.

Lord Jagannath | esakal

पुरीला बंगालशी जोडणारी ‘जगन्नाथ सडक’

मराठ्यांनी रस्ते, धर्मशाळा आणि विहिरी बांधल्या. त्यांनी यात्रेकरूंसाठी सोयीसुविधा, करसुधारणा आणि शेतीच्या विकासावर भर दिला.

jagannath puri | sakal

मराठ्यांचे प्रशासन

जमिनीची नोंदणी, सैनिकांची ठाणी, मठ व्यवस्था – आजही ओरिसात मराठ्यांचे अस्तित्व जाणवते.

jagganath puri | Sakal

रिकाम्यापोटी १ ग्लास पाण्यात चमचाभर तूप टाकून प्यायल्यास काय होईल?

Benefits Of Ghee | esakal
येथे क्लिक करा