Mayur Ratnaparkhe
जगदीश विश्वकर्मा गुजरात भाजपचे नवे अध्यक्ष झाले आहेत.
जगदीश विश्वकर्मा (पांचाळ) हे गुजरात भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.
जगदीश विश्वकर्मा यांचा जन्म १२ ऑगस्ट १९७३ रोजी अहमदाबाद येथे झाला.
जगदशी विश्वकर्मा २०१२ आणि २०१७ मध्ये अहमदाबाद शहरातील निकोल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.
सध्या जगदीश विश्वकर्मा भूपेंद्र पटेल सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात जगदीश विश्वकर्मा यांच्याकडे महत्त्वाची खाती स्वतंत्रपणे आहेत.
जगदीश विश्वकर्मा यांनी यापूर्वी अहमदाबाद शहर भाजप अध्यक्ष म्हणून काम केले होते.
जगदीश विश्वकर्मा हे अहमदाबादचे सर्वात श्रीमंत आमदार आहेत.
जगदीश विश्वकर्मा यांनी गेल्या निवडणुकीच्या शपथपत्रात २९ कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जाहीर केली होती.