जेलमध्ये कैद्यांचा दिवस कसा सुरू होतो? सकाळपासून रात्रीपर्यंत काय असतं?

Varsha Balhe

जेल

जेल म्हटलं की डोळ्यांसमोर येतात उंच भिंती, लोखंडी गज आणि कैद्यांचे कपडे. पण जेलमधील कैद्यांचा दिवस नेमका कसा जातो, हे तुम्हाला माहिती आहे का?

Life of Prisoners in Jail

|

esakal

दिवसाची सुरुवात

तुरुंगातील कैद्यांना साधारण पहाटे ४ ते ६ दरम्यान उठवलं जातं. त्यानंतर सर्व कैद्यांची हजेरी घेतली जाते आणि बराकीची स्वच्छता केली जाते.

Life of Prisoners in Jail

|

esakal

नाश्ता

सकाळी चहा-नाश्ता दिल्यानंतर कैद्यांना त्यांच्या कामानुसार वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जातं. काही जण स्वयंपाकघरात, तर काही जण शेती किंवा स्वच्छतेची कामं करतात.

Life of Prisoners in Jail

|

esakal

दुपारी जेवण

साधारण सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान कैद्यांना जेवण दिलं जातं. जेवणानंतर काही वेळ विश्रांती मिळते आणि पुन्हा हजेरी घेतली जाते.

Life of Prisoners in Jail

|

esakal

कामाला सुरुवात

दुपारी २ ते ५ या वेळेत कैदी पुन्हा काम करतात. काही जण शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, वाचन किंवा खेळ यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात.

Life of Prisoners in Jail

|

esakal

संध्याकाळी जेवण

संध्याकाळी साधारण ५ ते ७ दरम्यान रात्रीचं जेवण दिलं जातं. त्यानंतर कैद्यांची पुन्हा मोजणी केली जाते.

Life of Prisoners in Jail

|

esakal

रात्री

जेवण आणि हजेरीनंतर कैद्यांना त्यांच्या बराकीत किंवा कोठडीत बंद केलं जातं. यालाच तुरुंगातील भाषेत 'लॉकअप' म्हणतात.

Life of Prisoners in Jail

|

esakal

असा संपतो कैद्यांचा दिवस

लॉकअपनंतर काही तुरुंगांमध्ये कैद्यांना वाचन किंवा टीव्ही पाहण्याची संधी मिळते. त्यानंतर ते झोपतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांची दिनचर्या सुरू होते.

Life of Prisoners in Jail

|

esakal

साताऱ्याचा कंदी पेढा एवढा प्रसिद्ध कसा झाला? काय आहे १५० वर्षांपूर्वीचा इतिहास?

SATARA KANDI PEDHA HISTORY 150 YEARS OLD

|

esakal

येथे क्लिक करा