साताऱ्याचा कंदी पेढा एवढा प्रसिद्ध कसा झाला? काय आहे १५० वर्षांपूर्वीचा इतिहास?

Varsha Balhe

कंदी पेढा

सातारा म्हटलं की अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात. पण त्यापैकी एक खास गोष्ट म्हणजे साताऱ्याचा कंदी पेढा. हा पेढा महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात प्रसिद्ध आहे. पण हा पेढा एवढा प्रसिद्ध कसा झाला आणि त्यामागचा इतिहास काय आहे?

SATARA KANDI PEDHA HISTORY 150 YEARS OLD

|

esakal

कंदी पेढ्याची सुरुवात

साताऱ्यातील कंदी पेढ्याची परंपरा साधारण १५० वर्षांपूर्वी सुरू झाली. या पेढ्याच्या प्रसिद्धीमागे छत्रपती घराण्याचा आश्रय आणि मिठाई बनवणाऱ्या कारागिरांची मेहनत आहे.

SATARA KANDI PEDHA HISTORY 150 YEARS OLD

|

esakal

कारागीर

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती घराण्याच्या काळात कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खडकलाट गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबांना साताऱ्यात आणण्यात आलं. पुढे ही कुटुंबं लाटकर नावाने ओळखली जाऊ लागली.

SATARA KANDI PEDHA HISTORY 150 YEARS OLD

|

esakal

१८७४ पासून पेढ्याची परंपरा

१८७४ पासून सुरू झालेल्या या परंपरेला मोदीज नारायण पेढेवाले आणि लाटकर बंधूंनी पुढे नेलं. छत्रपतींकडून 'मोदी' हा किताब देण्यात आल्याचंही सांगितलं जातं.

SATARA KANDI PEDHA HISTORY 150 YEARS OLD

|

esakal

दुध

सुरुवातीच्या काळात साताऱ्याजवळील कास परिसरातील म्हशींचं घट्ट दूध पेढा बनवण्यासाठी वापरलं जात असे. या दुधापासून खवा तयार करून कंदी पेढा बनवण्याची पद्धत विकसित झाली.

SATARA KANDI PEDHA HISTORY 150 YEARS OLD

|

esakal

बनतो

कंदी पेढा बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधापासून खवा तयार केला जातो. त्यानंतर हा खवा लोखंडी कढईत मंद आचेवर भाजला जातो. या प्रक्रियेमुळे पेढ्याला खास चव आणि रंग येतो.

SATARA KANDI PEDHA HISTORY 150 YEARS OLD

|

esakal

रंग आणि चव

साताऱ्याच्या कंदी पेढ्याचा रंग इतर पेढ्यांपेक्षा थोडा भुरकट असतो. खवा भाजण्याच्या खास पद्धतीमुळे त्याला खमंग चव येते. हीच त्याची वेगळी ओळख आहे.

SATARA KANDI PEDHA HISTORY 150 YEARS OLD

|

esakal

कमी साखर

या पेढ्यात साखरेचं प्रमाण तुलनेने कमी ठेवलं जातं. त्यामुळे खव्याची मूळ चव टिकून राहते. खाल्ल्यावर तो मऊ आणि रवाळ लागतो.

SATARA KANDI PEDHA HISTORY 150 YEARS OLD

|

esakal

हाताने तयार

पारंपरिक पद्धतीत कारागीर प्रत्येक पेढा हातावर वळून तयार करतात. त्यामुळे त्याचा आकार आणि चव टिकवण्यावर भर दिला जातो.

SATARA KANDI PEDHA HISTORY 150 YEARS OLD

|

esakal

साताऱ्याची खास ओळख बनला

साधारण १५० वर्षांची परंपरा, खवा भाजण्याची खास पद्धत आणि कारागिरांची मेहनत यामुळे कंदी पेढ्याला वेगळी ओळख मिळाली. आज साताऱ्यात येणारे अनेक लोक आवर्जून हा पेढा घेऊन जातात.

SATARA KANDI PEDHA HISTORY 150 YEARS OLD

|

esakal

घरांच्या छतावर चक्क डोंगराचे खडक! या शहरात लोक राहतात तरी कसे?

Setenil de las Bodegas Rock Houses

|

esakal

येथे क्लिक करा