Pranali Kodre
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारताने बांगलादेशला गुरुवारी (२० फेब्रुवारी) ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने या स्पर्धेतील मोहिमेला सुरुवात केली आहे.
असे असले तरी या सामन्यात बांगलादेशच्या तौहिद हृदोय आणि जाकर अली यांनी एक मोठा विक्रम या सामन्यात केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने ३५ धावातच ५ विकेट्स गमावल्या होत्या. अक्षर पटेलने ८ व्या षटकात सलग दोन चेंडूवर तान्झिद हसन आणि मुशफिकूर रहीम यांना बाद करत बांगलादेशला मोठा धक्का दिला होता.
त्यामुळे अक्षरकडे हॅटट्रीकची संधी होती. मात्र रोहित शर्माने जाकर अलीचा स्लीपमध्ये सोपा झेल सोडला. त्यामुळे अक्षरची हॅट्रिकची संधीही हुकली.
यानंतर मात्र जाकर अली आणि तोहिद हृदोय यांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी रचली. हृदोयने १०० धावांची, तर जाकरने ६८ धावांची खेळी केली. त्यामुळे बांगलादेशने सर्वबाद २२८ धावा केल्या.
दरम्यान, भारताविरुद्ध वनडेत बांगलादेशसाठी कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करण्याचा विक्रमही जाकर अली आणि तौहिद हृदोय यांच्या जोडीने केली.
तसेच वनडेमध्ये ६ व्या विकेटसाठी भारताविरुद्ध केलेलीही ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.
याआधी वनडेत ६ व्या विकेटसाठी कोणत्याच संघाच्या फलंदाजांना भारताविरुद्ध १५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करता आली नव्हती.