सकाळ डिजिटल टीम
महाभारतात "जांभूळ आख्यान" म्हणून एक अख्यायिका सांगितली जाते. सत्य आणि प्रामाणिकपणाचं महत्व म्हणून या कथेकडं पाहिलं जातं
Jambhul
Esakal
वनवासात असताना द्रौपदी, श्रीकृष्ण आणि पांडव जंगलात फिरत होते. त्यावेळी द्रौपदीने झाडारचं एक मोठं टपोरं जांभूळ तोडलं.
Jambhul
Esakal
तपस्वी ऋषींच्या तपश्चर्येचं फळ म्हणून ते जांभूळ राखून ठेवलं होतं. आता ते तोडल्यामुळे ऋषीचा कोप होऊन सर्वांना शाप लागेल अशी भीती वाटू लागली.
Jambhul
Esakal
पांडवांवर ओढावलेल्या या संकटात श्रीकृष्ण धावून आले. त्यांनी यावर उपायही सांगितला. प्रत्येकानं मनातल्या इच्छा आणि सत्य सांगितल्यास हे तुटलेलं जांभूळ त्याच्या जागी चिकटेल असं कृष्ण म्हणाले.
Jambhul
Esakal
श्रीकृष्णाने उपाय सांगताच युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांनी त्यांच्या मनातल्या इच्छा सांगितल्या. त्यांनी सत्य बोलून दाखवलं.
Jambhul
Esakal
पांडवांनी सत्यकथन करताच जांभूळ वर सरकलं पण झाडाला चिकटलं नाही. श्रीकृष्णांनी द्रौपदीला सत्य बोलण्यास सांगितलं.
Jambhul
Esakal
द्रौपदीनं तिच्या मनात कर्णाबद्दल निर्माण झालेल्या भावना व्यक्त केल्या. तिच्या या प्रामाणिक कबुलीनंतर चमत्कार घडला आणि जांभूळ त्याच्या जागी चिकटले.
Jambhul
Esakal
महर्षी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारतात जांभूळ आख्यान नाही. मात्र महाभारतातली ही अख्यायिका प्रामाणिकपणाचं महत्त्व म्हणून सांगितली जाते.
Jambhul
Esakal
alchohol