रणजी ट्रॉफी विजेत्या जम्मू-काश्मीरला BCCI किती कोटींचे बक्षीस मिळणार?

Pranali Kodre

इतिहास घडला

जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रणजी ट्रॉफी जिंकून इतिहास घडवला आहे.

Jammu & Kashmir Cricket Team

|

Sakal

जम्मू-काश्मीर विरुद्ध कर्नाटक

हुबळी येथे झालेला जम्मू-काश्मीर विरुद्ध कर्नाटक हा रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णित राहिला.

Jammu & Kashmir Cricket Team

|

Sakal

पहिल्या डावातील आघाडी

मात्र अंतिम सामन्यात पहिल्या डावात घेतलेल्या तब्बल २९१ धावांच्या आघाडीच्या जोरावर जम्मू-काश्मीरला विजेते घोषित करण्यात आले.

Aquib Nabi

|

Sakal

पहिल्या प्रयत्नात विजेतेपद

जम्मू-काश्मीरने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात प्रवेश केला होता आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

Jammu & Kashmir Cricket Team

|

Sakal

बक्षीस

या विजेतेपदानंतर आता बीसीसीआयच्या नियमानुसार विजेते म्हणून जम्मू-काश्मीर संघाला ५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.

Jammu & Kashmir Cricket Team

|

Sakal

उपविजेते

तसेच उपविजेत्या कर्नाटकला ३ कोटी, तर उपांत्य फेरीतून बाहेर पडलेल्या बंगाल आणि उत्तराखंड संघांना १ कोटी बक्षीस म्हणून मिळेल.

Karnataka Cricket Team

|

Sakal

मुख्यमंत्र्यांकडूनही बक्षीस

याशिवाय जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी संघाला २ कोटी बश्रीस देण्याची घोषणा केली आहे.

Jammu & Kashmir Cricket Team

T20 WC: फक्त ४ ओव्हरमध्ये ७० धावा! न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घडवला इतिहास

Mitchell Santner & Cole McConchie World Record

|

Sakal

येथे क्लिक करा