Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत २५ फेब्रुवारीला न्यूझीलंडने श्रीलंकेला तब्बल ६१ धावांनी पराभूत केलं.
New Zealand
Sakal
या सामन्यात न्यूझीलंडकडून फलंदाजीदरम्यान कर्णधार मिचेल सँटेनर आणि कोल मॅकोन्ची यांनी इतिहास घडवला.
Mitchell Santner & Cole McConchie World Record
Sakal
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने १२.१ षटकात ८४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या, त्यावेळी सँटेनरला फलंदाजीसाठी साथ देण्यास मॅकॉन्ची उतरला.
Cole McConchie
Sakal
या दोघांनी भागीदारी करताना पहिल्या २३ चेंडूत १४ धावाच काढल्या. त्यामुळे १६ षटकात न्यूझीलंड ६ बाद ९८ अशा स्थितीत होते.
Mitchell Santner & Cole McConchie World Record
Sakal
मात्र त्यानंतर या दोघांनी टॉप गिअर टाकला आणि चौकार-षटकारांची बरसात करताना शेवटच्या ४ षटकात म्हणजेच २४ चेंडूत तब्बल ७० धावा ठोकल्या.
Mitchell Santner
Sakal
त्यामुळे न्यूझीलंड २० षटकात ७ बाद १६८ धावांपर्यंत पोहचू शकले. सँटनर शेवटच्या चेंडूवर ४७ धावांवर बाद झाला, पण मॅकॉन्ची ३१ धावांवर नाबाद राहिला.
Cole McConchie
Sakal
सँटेनर आणि मॅकॉन्ची यांच्यात ७ व्या विकेटसाठी तब्बल ८४ धावांची भागीदारी झाली.
Mitchell Santner
Sakal
त्यामुळे केवळ टी२० वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात ७ व्या विकेटसाठी झालेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली.
Mitchell Santner & Cole McConchie World Record
Sakal
यापूर्वी हा विक्रम माईक हसी आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या नावावर होता. त्यांनी २०१० टी२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध ७ विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली होती.
Mike Hussey & Steve Smith
Sakal
T20 World Cup: How Net Run Rate (NRR) is Calculated Explained Simply
eSakal